महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. वाचा संक्षिप्त वृत्तांत . . .

विजयोत्‍सवासाठी संघर्ष अटळ !

अखंड आणि अजेय हिंदुस्‍थानची निर्मिती हे हिंदु राष्‍ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्‍ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्‍पूर्वी ते प्रत्‍येकाच्‍या मनात येणे आवश्‍यक आहे, तरच तो तिथे रहाण्‍यास पात्र होईल !

गेल्‍या वर्षभरात सनातनचे विविध भाषांत ३४ नवीन ग्रंथ प्रसिद्ध आणि २५४ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !

अखिल मानवजातीच्‍या उद्धारार्थ हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची गुढी उभारण्‍यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्‍ट्र’ हे धर्माच्‍या अधिष्‍ठानावरच उभे रहाणार असल्‍याने हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्‍यक आहे.

सीबीडी, सानपाडा, आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रा !

गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, सानपाडा आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडी येथे ‘सकल हिंदु समाज’ यांच्या वतीने कालीमाता मंदिर ते अलबेला हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

श्री संत वेणास्‍वामी मठाच्‍या वतीने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रम !

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी दुपारी ४ वाजता भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व उपक्रमांचा हिंदु बांधवांनी तन-मन-धन यांद्वारे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२५ मार्च २०२०) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.