काँग्रेसींचे धर्मांधप्रेम जाणा !

मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.

काँग्रेसचे मंत्री मौलवी आणि पाद्री यांच्याविषयी असे बोलतील का ?

‘साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’, असे विधान महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अन् काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केले.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

धर्मांधांच्या जमावाने देहलीतील मंगोलपुरी भागातील रिंकू शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून पाठीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. श्रीराममंदिराविषयी काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

धर्मांधांचा नेहमीचा कांगावा जाणा !

देशात काही लोकांकडून मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न चालू आहेे, असा फुकाचा आरोप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका कार्यक्रमात केला.

समान नागरी कायद्याची आवश्यकता जाणा !

मुसलमान मुलगी जर अल्पवयीन असली, तरी तिचा विवाह वैध आहे, असा निर्णय पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉच्या आधारे एका प्रकरणात दिला.

भारतातील धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !

जगात मुसलमान एकमेकांसमवेत लढून संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू आणि ख्रिस्तीही नाहीत. मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केले.

धर्मांधांची अंधश्रद्धा जाणा !

पलक्कड (केरळ) येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्‍या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

साम्यवाद्यांचा घटनाद्रोह आणि हिंदुद्वेष जाणा !

हिंदु ऐक्य वेदी संघटनेचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना हिंदूंना हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून केरळमधील माकपच्या आघाडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली.

अशा मदरशांवर बंदी घाला !

उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. सरकारने विशेष अन्वेषण पथकाद्वारे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

जनतेची सुरक्षा वार्‍यावर !

भारतात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस आहेत. याचाच अर्थ देशातील ६४१ व्यक्तींची सुरक्षा केवळ १ पोलीस कर्मचारी करत आहे, अशी माहिती ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०’द्वारे समोर आली आहे.