काँग्रेसची गुंडगिरी जाणा !

जलालाबाद (पंजाब) येथे निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार दगफडेक झाली. या वेळी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

अशांना कारागृहात डांबा !

आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे, अशी गरळओक अलीगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत केली.

चीनचा बटीक झालेला पाक !

चीनने मला बलुची लोकांचे आंदोलन चिरडण्यासाठी, तसेच भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी येथे तैनात केले आहे, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख मेजर जनरल अयमान बिलाल यांनी केले आहे.

आतंकवाद्यांना धर्म असतो !

राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले. ‘सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे हा स्फोट करण्यात आला’, असे तिने म्हटले आहे.

अशांना कठोर शिक्षा व्हावी !

प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात १ शेतकरी ठार झाला, अशी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई आदी पत्रकारांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताज्या करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पावले उचललेल्या १८० देशांची सूची बनवण्यात आली आहे. यात भारत ८६ व्या, तर चीन ७८ व्या क्रमांकावर आहे.

यापेक्षा समान नागरी कायदा करा !

जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण हम दो हमारे पांचचा संकल्प केला पाहिजे, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करा !

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता; मात्र यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला. यात दोघा शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तर १८ पोलीस घायाळ झाले.

ख्रिस्ती बिशपची धर्मांधता जाणा !

केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चचे समर्थन असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची शिफारस बिशप जॅकब मनथोदाथ यांनी माकपचे राज्य सचिव कनम राजेंद्रन् यांना गोपनीय पत्र लिहून केली आहे.

ख्रिस्ती धर्मप्रचारकाचे खरे स्वरूप जाणा !

तमिळनाडू राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.