भारताने श्रीलंकेला साहाय्य करू नये !
भारताने केलेल्या प्रखर विरोधानंतरही श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्या ‘युआन वांग ५’ या युद्धनौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही नौका या बंदरात येणार आहे.
भारताने केलेल्या प्रखर विरोधानंतरही श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्या ‘युआन वांग ५’ या युद्धनौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही नौका या बंदरात येणार आहे.
अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी हिंदी चित्रपट ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले; म्हणून गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांनी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बक्षी यांनी विरोध केला आहे.
मुसलमान संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कर्नाटकातील मंगळुरू विश्वविद्यालयात ११ ऑगस्ट या दिवशी होणारी भारतमातेची पूजा रहित करण्यात आली.
शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाऐवजी शिखांचा ध्वज ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानावरही टीका केली.
‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहे. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.
मलप्पूरम् (केरळ) येथे रामायणावर आधारित ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत महंमद जाबिर पीके आणि महंमद बसीथ एम्. या दोघा मुसलमान तरुणांनी यश मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्तरप्रदेशातील ‘बडी संगत’ संप्रदायाचे महंत बजरंग मुनी यांना भ्रमणभाषवरून मौलाना मुश्ताक खान याने ‘सिर तन से जुदा’ची धमकी दिली आहे. १ वर्षापूर्वी काही मुसलमानांनी महंतांवर शस्त्रांद्वारे आक्रमणही केले होते.
डहाणू येथे एका हिंदु महिलेच्या घरी धर्मांतराचा होणारा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने हाणून पाडला. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४ ख्रिस्ती मिशनर्यांना अटक केली.
प्रसिद्ध साप्ताहिक ‘द वीक’ने भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्लाघ्य चित्र प्रसिद्ध केले आहे. याविरोधात भाजपचे नेते प्रकाश शर्मा यांनी कानपूरमध्ये तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.