३ मासांत म्हादई अभयारण्य  व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करा !

म्हादई पाणी जल लवादाने केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकाची मुदत केंद्र सरकारने आणखी १ वर्षाने वाढवली आहे. अशा प्रकारे वर्षानुवर्षे वारंवार मुदतवाढ दिल्यावर पाणीप्रश्न आणि त्यासंबंधीचे राज्यांचे प्रश्न कधी सुटतील का ?

चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.

सोलापूर येथील ‘पर्यावरण दूत’ डॉ. मनोज देवकर यांचा होणार सन्‍मान !

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा राष्‍ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुणे येथील ‘हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रदान करण्‍यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्‍कार येथील वनस्‍पतीशास्‍त्र पदवी प्राप्‍त डॉ. मनोज देवकर यांना देण्‍यात येणार आहे.

ग्राहकांनी वीजदेयकात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा !

देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

सोलापूर विद्यापिठात २४ जुलैला होणार ‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर यांचा सन्मान

वाटेकर हे कोकण इतिहास आणि संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.

‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्‍ट्र देशातील पहिले राज्‍य, मंत्रीमंडळाची मान्‍यता !

४ जुलै या दिवशी झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्‍यात आला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?

छत्रपती संभाजीनगर येथील १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतील विषारी पाणी थेट नाल्‍यांत !

यामुळे भूमीतील जलस्रोत दूषित होत आहेत. याकडे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्‍याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्‌पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे.

‘नासा’च्या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेल्या समुद्राच्या वाढत्या स्तरावर जागतिक चिंता व्यक्त !

गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.