गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस : वेधशाळेचा अंदाज

नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी गोव्यात पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध

श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत.

नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे आवश्यक ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे

चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था

हा  उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवणमध्ये पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, तर भाजपचे प्रकल्पाला समर्थन !

‘या प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे’, असे सांगत बारसू येथे या प्रकल्पाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला.

७ सहस्र ५०० झाडांच्या कत्तलीविरोधात तरुणांचे पुणे येथे ‘चिपको’ आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी !

यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.

खाणींसाठी नव्याने पर्यावरण दाखला घेण्याचा गोवा खंडपिठाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नव्याने पर्यावरण दाखला घेण्यास सांगितले आहे. ‘सोसीयेदाद-द-फॉमेंतो’ यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर गोवा खंडपिठाने हा निर्णय दिला.

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?