गोथेनबर्ग (स्वीडन) – पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. प्लास्टिक मोठ्या प्रमाणात विषारी असल्याने त्याला ‘पेपर’ हा पर्याय होता; परंतु आता पेपरही मोठ्या प्रमाणात प्रदूषणकारी असल्याचे समोर आले आहे. स्वीडनच्या गोथेनबर्ग विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनात आढळून आले की, विषारी रसायनांपासून बचाव करण्यासाठी पेपर कपचा उपयोग करणे, हा प्लास्टिकला पर्याय होऊ शकत नाही.
Switching from plastic to paper cups: researchers show that a paper cup that ends up in nature can also cause damage to environment, as they also contain toxic chemicals. via /r/science https://t.co/s85qCrPDeA
— Giulio Magnifico (@giuliomagnifico) August 25, 2023
विश्वविद्यालयातील संशोधनकर्त्यांनी फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्या रसायनांचा कसा परिणाम होतो ?, हे अभ्यासले. या वेळी लक्षात आले की, प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.