हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये भूस्खलन, राज्यातील २४२ रस्ते बंद !
नवी देहली – देशातील १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्किम, बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि तामिळनाडू या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१. उत्तराखंड राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
२. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात ११ ऑगस्ट या दिवशी भूस्खलन झाले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ बंद करण्यात आला. राज्यभरात होत असलेल्या पावसामुळे २४२ रस्ते बंद करण्यात आले आहेत.
३. बिहारच्या पाटलीपुत्र शहरात गंगा नदीची पातळी धोकादायक झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
४. चंडीगडच्या सुखना सरोवराची पाण्याची पातळीही धोकादायक झाली आहे.
५. हरियाणाच्या १३ शहरांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.