पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’ वसाहतीतील एकही झाड तोडू नका !

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने अडचण ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली होती. छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये अवैधरित्या झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गोव्यातील नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित !

राज्यात अशा प्रकारे कुठे कुठे प्रकिया न करता सांडपाणी नद्या आणि समुद्र यांत सोडण्यात येते, त्याची शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.

तापमान वाढीमुळे जगातील निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर ! – संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !

इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रदूषणकारी !

‘इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक नाहीत’, असे एका संशोधनाच्या निष्कर्षातून नुकतेच समोर आले आहे. ‘इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक का नाहीत ?’, यामागील कारणांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

धरण म्हणजे नदीसह शेकडो प्रजातींचे मरण आणि महापुराला आमंत्रण !

ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !

देशातील ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात !

यास उत्तरदायी असलेल्या जनताद्रोही अधिकार्‍यांची सरकारने सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून ही हानी वसूल करावी आणि त्यांना आजन्म कारागृहात टाकावे ! यासह सरकारी भूमी गिळंकृत करणार्‍या भूमाफियांनाही सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

भारतातील कार्बन उत्सर्जन केवळ ५ टक्के !

पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

स्थानिक तापमानवाढीमुळे हिमालयावर ताण : अल्प उंचीवर उगवणारी झाडे आता अधिक उंचीवर आढळतात !

विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्‍चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !