भोर (पुणे) येथील २ सहस्र ८४४ हेक्टर क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित !
तालुक्याच्या हिर्डोशी आणि नीरा देवघर धरणांच्या खोऱ्यातील १४ गावांमधील वन विभागाच्या २ सहस्र ८४४ हेक्टर क्षेत्राला ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) देण्यात आला आहे.