भारतातील कार्बन उत्सर्जन केवळ ५ टक्के !

पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बर्लिन (जर्मनी) – गरीब देश पर्यावरणाला अधिक हानी पोचवतात, असा भ्रम आहे. भारताचा एक सहस्रांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास पहाता या भ्रमाचे मी पूर्णपणे खंडण करतो. भारत जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगाची १७ टक्के लोकसंख्या भारतात रहाते; मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ ५ टक्के आहे, असे प्रतिपादन जर्मनीतील बावेरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी-७’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.