केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप
भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जिल्हा संभाजीनगर) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अवमानित केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही
राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची द्विवार्षिक निवडणूक २९ जानेवारी या दिवशी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक ‘पुण्यनगरी’चे प्रतिनिधी श्री. मंदार पारकर, तर उपाध्यक्षपदी दैनिक ‘शिवनेर’ श्री. महेश पावसकर विजयी झाले.
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या धर्मप्रेमींची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले.
नक्षलग्रस्त भागात निवडणुका झाल्या, ही चांगलीच गोष्ट झाली; मात्र त्यासाठी एवढी वर्षे जावी लागणे, हेसुद्धा विचार करायला लावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आजही अशी गावे आहेत की, जेथे लोकनियुक्त सरकार नाही, तर एकप्रकारे नक्षलवादी राज्य करतात, हे लज्जास्पद नव्हे का ?
नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.