‘नीट’, ‘जे.ई.ई.’च्या प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण !

पुणे – ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा), ‘जे.ई.ई.’च्या (संयुक्त प्रवेश परीक्षेच्या) प्रश्नपत्रिका फुटल्या, हे दुर्दैवीच आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची हानी झाली. त्यातून लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास संपतो. अशा काळात दायित्व निश्चित नसते, असे नाही. सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते. व्यवस्थेत सुधारण्यासाठी प्रयत्नही केले जातात. त्यातूनही काही राहिले असते, तर तुम्ही-आम्ही या पदावर राहिलो नसतो, हे अपवाद आहेत, ही मानवी प्रवृत्ती आहे, असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मांडले. ते ‘ज्ञानसंकुल विद्यार्थी संघा’च्या ‘प्राचीन संहिता गुरुकुल’च्या वतीने ‘दिग्गजांच्या मुलाखती’ या कार्यक्रमात बोलत होते. सिंह पुढे म्हणाले, ‘‘प्रत्यक्षात परीक्षा घेतांना मोठी सिद्धता करावी लागते. अनेक केंद्रे असतात. त्या केंद्रांवर सहस्रो विद्यार्थी, वेगवेगळ्या भाषा, त्यासाठीचे भाषांतर अशा अनंत गोष्टी असतात.
सध्या माणसाला अल्प वेळेत यश हवे असते. मूलभूत मूल्ये आता राहिली नाहीत. कुटुंबाचे दायित्व राहिले नाही. समाजाचे मूल्यसंवर्धन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातूनच नव्हे, तर आचरणातूनही मूल्ये कशी मिळतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ निवडींमध्ये लवचिकता देते. त्यासाठी राज्यांना स्वातंत्र्य दिले आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेमध्ये निवडता येते. यात कसलीही शंका नाही, असेही आयुक्त प्रताप सिंह म्हणाले.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !