
मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची द्विवार्षिक निवडणूक २९ जानेवारी या दिवशी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक ‘पुण्यनगरी’चे प्रतिनिधी श्री. मंदार पारकर, तर उपाध्यक्षपदी दैनिक ‘शिवनेर’ श्री. महेश पावसकर विजयी झाले. या निवडणुकीत १७९ सदस्यांपैकी १६२ जणांनी मतदान केले.
अध्यक्षपदासाठी ३ जणांनी अर्ज भरले होते. त्यामध्ये श्री. मंदार पारकर यांना सर्वाधिक ७२ मते मिळाली. मंदार पारकर १० मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी ५ जणांनी अर्ज भरले होते. त्यामध्ये श्री. महेश पावसकर यांना ४६ मते मिळाली. श्री. महेश पावसकर २ मतांनी विजयी झाले. कार्यवाहपदी श्री. प्रमोद डोईफोडे २० मतांनी निवडून आले. त्यांना सर्वाधिक ८९ मते मिळाली. कार्यवाहपदासाठी
२ जणांनी अर्ज भरला होता. कोषाध्यक्षपदी सौ. नेहा पुरव आणि श्री. प्रवीण राऊत यांना समसमान ७५ मते मिळाली. त्यामुळे दोघांनाही प्रत्येकी १ वर्षासाठी पदाचा कार्यभार दिला जाणार आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून हरिसिंह राजपुरोहित, अशोक अडसूळ, सोनू श्रीवास्तव, राजू झनके, मिलिंद लिमये हे विजयी झाले आहेत.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६