‘रोटरी’च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावांतील शाळांमध्ये निसर्ग आणि वन्यजीव शिक्षण कार्यक्रम ! – आशिष पिलानी

कोल्हापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘सह्याद्री वाइल्डलाईफ’, ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईझ’ आणि ‘टाटा एआयए’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील चंदगड, आंबोली, दोडामार्ग आणि तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रातील २० दुर्गम गावांतील शाळांमध्ये निसर्ग अन् वन्यजीव शिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात मानव-प्राणी संघर्षाच्या दीर्घकाळ झेलणार्‍या ग्रामस्थांच्या जीवनात सकारात्मक पालट घडवून आणणे हा उद्देश आहे, अशी माहिती ‘रोटरी’चे आशिष पिलानी यांनी दिली. या प्रसंगी ‘रोटरी सोशल ट्रस्ट’चे अध्यक्ष सचिन झंवर, सचिव शिशिर शिंदे, सचिन मालू, चंदन मिरजकर, डॉ. भरत कोटकर यांसह अन्य उपस्थित होते.

१. शेतभूमींचे संरक्षण करणे आणि प्राणी लोकवस्तीत येऊ नये यांसाठी खंदक, जैविक कुंपण, जंगलभागात वनतळी, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वृक्षारोपण, माहितीफलक यांचा समावेश आहे.

२. ‘सह्याद्री वाइल्डलाईफ’ संस्था पश्चिम घाटातील वैविध्यपूर्ण परिसंस्था जतनासाठी समर्पित आहे. हा प्रदेश वनस्पती आणि जीवजंतू यांनी समृद्ध आहे. बर्‍याच गोष्टी शिकार, हवामान पालट यांमुळे धोक्यात आहेत. त्या संवर्धनासाठी प्रयत्नरत आहोत.