देशवासियांमध्ये जागृती !

देशवासियांमध्ये जागृती !

‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत ?’ असा प्रश्न त्यांनी एकदा उपस्थित केला होता ! त्यांना शुभेच्छा !

आर्थिक महासत्तेचे अपयश !

आर्थिक महासत्तेचे अपयश !

गोळीबार, लूटमार आणि जाळपोळ यांचा सामना करण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून भरती होणारे नव्हे, तर सक्षम अन् समर्थ असे पोलीसदल उभारायला हवे. तरच गुन्हेगारी न्यून होऊन अमेरिकेचे जागतिक महासत्तेचे पद अबाधित राहील, अन्यथा पोलीस विभागाप्रमाणे राष्ट्रालाही उतरती कळा लागेल !

पोलिसांचे अफझलप्रेम !

पोलिसांचे अफझलप्रेम !

अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्‍या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.

अल्पवयीन गुन्हेगार !

अल्पवयीन गुन्हेगार !

मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी नीतीमत्तेचे संस्कार साधनेने दृढ होतात. ‘धर्मनिष्ठ प्रजा’ हेच आदर्श राष्ट्राच्या निर्मितीचे मूळ मानले गेले आहे. त्यामुळे गुन्हे आणि मुले यांसारख्या संवेदनशील विषयांसाठी धर्मशिक्षण हाच अंतिम उपाय आहे !

मराठीचे मरण !

मराठीचे मरण !

धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्‍यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’

‘जंक फूड’ !

‘जंक फूड’ !

‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.

‘ड्रगमाफिया’ कोण ?

‘ड्रगमाफिया’ कोण ?

शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण देण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. समस्येच्या मुळाशी न जाता उपाययोजना केल्यास गुन्हेगार त्यावरही मार्ग काढतो आणि पुढे समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करते किंवा जटील बनते. शासनकर्ते हे लक्षात घेतील, ही अपेक्षा !

हिशोब द्या !

हिशोब द्या !

अनेक गोष्टी विनामूल्य देण्याचे आमीष देऊन सरकार स्थापन झाले, तरी ते चालवण्यासाठी लागणारी नीतीमत्ता आपकडे दिसलेली नाही, हेच सत्य आहे ! बाकी राजकारण आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या २ बाजू झालेल्या आहेत. आपचे सरकारही त्याला अपवाद राहिलेले नाही, हे पुन: पुन्हा समोर येत आहे !

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !