देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा !

मुंबई – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ऑगस्‍टपासून जपान येथे जात असून महाराष्‍ट्र आणि जपान यांच्‍या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्‍याय चालू करण्‍याच्‍या दृष्‍टीने या दौर्‍यात प्रयत्न होणार आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्‍य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्‍प, सामंजस्‍य करार अन् सहकार्य आदींच्‍या दृष्‍टीने हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्‍सी’ (जायका)कडून अर्थसाहाय्‍य मिळवून विविध प्रकल्‍प मार्गी लावण्‍याचा राज्‍यशासनाचा प्रयत्न आहे. जपानमधील काही उद्योगांशी सामंजस्‍य करार करण्‍यात येतील.