
संभाजीनगर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीविषयी मला काहीही ठाऊक नाही. त्यांची भेट झाली, अथवा नाही किंवा किती वेळ झाली ? या संदर्भात कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या होणार असण्याविषयी मला काहीही ठाऊक नाही. जर उद्या असेल, तर नक्की कळवतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ ऑगस्ट या दिवशी येथील चिखलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच गुप्त भेट घेतल्याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !