देहलीतील ‘अकबर रोड’ला जनरल बिपीन रावत यांचे नाव द्या ! – भाजपची देहली नगरपरिषदेकडे मागणी

अकबर हा आक्रमणकर्ता असतांना रस्त्याला आतापर्यंत त्याचे नाव असणे हिंदूंना लज्जास्पद !

भ्रष्टाचार जीवनाची एक पद्धत बनली आहे !

माजी सरन्यायाधिशांच्या या विधानातून ‘सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे’, असाच अर्थ निघतो. यातून भारत कोणत्या दिशेने चालला आहे, हे स्पष्ट होते ! ही स्थिती केवळ धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते, हे लक्षात घ्या !

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार परिसरातील मंदिरात मूर्ती ठेऊन पूजा करण्याची मागणी नाकारली.

जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

भारताच्या राष्ट्रप्रेमी सेनापतीच्या मृत्यूविषयी अशा प्रकारचा विद्वेष पसरवणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाखाली खटला चालवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

देहलीतील कॅन्टोनमेंट येथे बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांचे मृतदेह तमिळनाडूतील ‘मद्रास रेजिमेंट सेंटर’मध्ये आणण्यात आले आहेत. येथून जनरल रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव देहलीत आणण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

देहलीतील रोहिणी न्यायालयात गावठी बाँबचा स्फोट

देहली पोलिसांच्या म्हणण्यानुसार न्यायालयात झालेला स्फोट हा अल्प तीव्रतेचा आहे. हा एक प्रकारचा गावठी बाँब आहे. त्याच वेळी घटनास्थळावर स्फोटके आणि खाऊच्या डब्यासारखी वस्तू आढळली आहे.

देशात अधिकोषांतील निष्क्रीय खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून ! – केंद्रीय अर्थमंत्री

देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही.

‘ट्विटर’वर व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत ! – ‘ट्विटर’चे नवे धोरण

‘ट्विटर’ आस्थापनाने त्याच्या धोरणात महत्त्वपूर्ण पालट केला आहे. त्यानुसार आता कोणत्याही व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे किंवा व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत