भ्रष्टाचार जीवनाची एक पद्धत बनली आहे !

‘सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार आहे का ?’ या प्रश्‍नावर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तर

माजी सरन्यायाधिशांच्या या विधानातून ‘सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे’, असाच अर्थ निघतो. यातून भारत कोणत्या दिशेने चालला आहे, हे स्पष्ट होते ! ही स्थिती केवळ धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते, हे लक्षात घ्या !

झी न्यूज चे सुधीर चौधरी आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

नवी देहली – ‘भ्रष्टाचार तितकाच प्राचीन आहे जितका समाज आहे. आज भ्रष्टाचार जीवनाची एक पद्धत बनली असून लोक ती स्वीकारतात, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केले. ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुधीर चौधरी यांनी रंजन गोगोई यांची मुलाखत घेतली. त्यात श्री. चौधरी यांनी ‘सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार आहे का ?’ असा प्रश्‍न विचारला असता गोगोई यांनी वरील विधान केले.

(सौजन्य : Zee News)

या वेळी रंजन गोगोई यांनी विविध प्रश्‍नांची उत्तरे दिली. श्रीरामजन्मभूमी विषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल मी एकट्याने दिलेला नाही, तर माझ्या समवेत अन्य ४ न्यायाधीश होते आणि आम्ही मिळून तो दिला आहे.’’

गोगोई यांच्यावर ते सरन्यायाधीश असतांना महिला एका कर्मचार्‍याचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप झाला होता. त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी ‘या प्रकरणाची चौकशी न्यायाधीश शरद बोबडे यांना मीच करायला सांगितली होती आणि त्यांनी मला निर्दोष ठरवले होते’, असे स्पष्ट केले.