काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधून एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी हे कलम हटवण्यात आले होते.

नित्यानंद राय म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवल्यानंतर येथे एकही दंगल झाली नाही. हे कलम रहित केल्यापासून, म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३६६ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर ८१ सैनिक हुतात्मा झाले. त्या वेळी ९६ लोकांचा मृत्यू झाला.