सामाजिक माध्यमांतून युवतींची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा गैरवापर करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या वाढत्या घटना !

सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते

वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात अल्प प्रमाणात घट !

सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !

‘पतंजलि’चे स्टोअर उघडून देण्याच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक !

तक्रारदाराने एजन्सीसाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले.

वर्ष २०२० मध्ये विदेशातून भारतावर ११ लाख ५८ सहस्र सायबर आक्रमणे !

भारतीय तरुण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत सर्वाधिक पुढे असतांना भारतावर एवढ्या मोठ्या संख्येने होणारी सायबर आक्रमणे रोखता न येणे लज्जास्पद !

चांगली नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर सायबर पोलिसांची कारवाई !

चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !

नागपूर येथे प्रतिष्ठित व्यक्तींना सामाजिक माध्यमांवर बनावट फेसबूक खाते बनवून दिला मनस्ताप !

वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींना तत्परतेने कठोर शासन होणे आवश्यक !

मुलांचे अश्‍लील साहित्य प्रसारित केल्यावरून ट्विटरविरुद्ध गुन्हा नोंद !

ट्विटरचा प्रतिदिन उघड होणारा गुन्हा पहाता आता त्याच्यावर बंदीच घालणे आवश्यक !

बनावट संकेतस्थळ बनवून श्रीराममंदिराच्या नावाखाली देणगी गोळा करून लाखो रुपये उकळणार्‍या ५ जणांना अटक

मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

गोपनीय माहितीद्वारे पुणे येथील महिलेच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र रुपये काढणार्‍या अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद !

ए.टी.एम्. कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र ८१० रुपये ऑनलाईनद्वारे काढून घेतले.

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !