बनावट संकेतस्थळ बनवून श्रीराममंदिराच्या नावाखाली देणगी गोळा करून लाखो रुपये उकळणार्‍या ५ जणांना अटक

मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी बनावट संकेतस्थळ बनवून देणगी गोळा करणार्‍या ५ जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून रामभक्तांकडून लाखो रुपये गोळा केल्याचे उघड झाले आहे. ‘रामजन्मभूमी ट्रस्ट, अयोध्या’ या नावाने त्यांनी  बनावट संकेतस्थळ बनवले होते. देगणी देऊ इच्छिणार्‍यांसाठी त्यांनी संकेतस्थळावरून बँकेचे खाते क्रमांकही प्रसारित केले होते. आशिष गुप्ता, नवीन कुमार सिंह, सुमित कुमार, अमित झा आणि सूरज गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ भ्रमणभाष संच, १ लॅपटॉप आणि आधार कार्डच्या ५० प्रती, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.