ट्विटरचा प्रतिदिन उघड होणारा गुन्हा पहाता आता त्याच्यावर बंदीच घालणे आवश्यक !
नवी देहली – देशभरात ट्विटरच्या विरोधात एकूण ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात चुकीचे मानचित्र दाखवल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे, सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेश येथे, तर लहान मुलांशी संबंधित अश्लील साहित्य प्रसारित केल्याचा प्रकरणी देहली पोलिसांच्या सायबर शाखेकडे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या तक्रारीवरून सायबर शाखेने गुन्हा नोंदवला आहे. ट्विटरवर लहान मुलांसंबंधी अश्लील साहित्य सतत प्रसारित केले जाते, असे या तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संसदीय समितीने ट्विटरला या प्रकरणी २ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.