शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !

अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ९ लाख पळवणार्‍यांना अटक !

अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ग्राहकाच्या खात्यातून ९ लाख रुपये पळवणार्‍या दोघांना पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल आणि बिरेनभाई शांतीलाल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर खाते ‘हॅक’ !

‘ट्विटर’सारखी सामाजिक माध्यमे ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, त्याच मंत्रालयाचे ट्विटर खाते जेथे हॅक होते (नियंत्रित केले जाते), तेथे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांची सुरक्षितता कधीतरी राखली जाऊ शकेल का ?

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाकडे ११ कोटींच्या खंडणीची मागणी !

बजाज यांना ई-मेलद्वारे खंडणी मागण्यात आली असून ती न दिल्यास आस्थापनाची मोठी हानी केली जाईल, अशी धमकीही ई-मेलद्वारे देण्यात आली आहे.

मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !

मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणखी एका शिक्षकाला अटक !

आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली.

राज्यात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांपैकी केवळ २५ टक्के गुन्ह्यांचाच छडा लागत असल्याची गृहमंत्र्यांची स्वीकृती !

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण न्यून करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतांना असे का होते ? याचेही उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे !

‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखून सामाजिक माध्यमांवरील भावनिक बाजारापासून सावधान रहा ! – अजित पारसे, सायबर तज्ञ

शहरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०१९ मध्ये १२६ गुन्ह्यांची, तर वर्ष २०२० मध्ये २०० च्या आसपास गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे !’

पाकिस्तान्यांकडून मुंबई पोलिसांचा ई-मेल ‘हॅक’ !

हा मेल अन्य शासकीय खात्यांसमवेतच नागरिकांनाही पाठवण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भारतियांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे. हा मेल उघडल्यास हॅकर्सना संबंधित ई-मेल आणि यंत्रणा यांचा ‘पासवर्ड’ मिळतो.