गोपनीय माहितीद्वारे पुणे येथील महिलेच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र रुपये काढणार्‍या अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, १६ जून – वानवडी येथील ४७ वर्षीय महिलेने येथील कॅम्प परिसरातील ए.टी.एम्.मधून १० सहस्र रुपये काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पैसे न निघाल्याने त्यांनी गूगलवरून अधिकोषाच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचा संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने सर्व माहिती देतो, असे सांगत ए.टी.एम्. कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र ८१० रुपये ऑनलाईनद्वारे काढून घेतले.

या प्रकारानंतर खात्यातून पैसे अल्प झाल्याचा लघुसंदेश आल्यानंतर संबंधित महिलेने तात्काळ पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. त्यानुसार अज्ञात भ्रमणभाष धारकावर आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.