भारतीय स्टेट बँकेची ४ सहस्र ७३६ कोटी रुपयांच्या फसवणूक करणार्‍या आस्थापानांच्या संचालकांचे निवासस्थान आणि कार्यालय यांवर धाडी

सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

हत्या करण्यासाठी गोवंशीय आणि अन्य जनावरे बाळगल्याप्रकरणी १८ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गुन्हेगार धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यासच गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांकडून खाजगी बसचालकावर कारवाई

खाजगी बसमधून तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालक इंदरसिंह हिरालालजी गुजर (वय ४५ वर्षे) आणि वाहक भैरू शंभूनाथ (वय ४३ वर्षे) या दोघांना वैभववाडी पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.

कारागृह अधीक्षक आणि आय.आर्.बी. सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख यांना उत्तरदायी ठरवून त्यांचे त्यागपत्र घेणे आवश्यक ! – अधिवक्ता विनायक पोरोब

सर्व यंत्रणा हाताशी असतांना शासकीय विभागांमध्ये एवढा ढिसाळपणा दिसून येतो, हे लज्जास्पद !

बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

अशा राष्ट्रद्रोहींना नेमकी फूस कोणाची आहे, त्याची पाळेमुळेही शोधली पाहिजेत !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !

भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.

नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

भिवंडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोरंट वीज वितरण आस्थापनाची कार्यालये फोडली

आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

गुन्ह्याची माहिती लपवल्याने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे पारपत्र कह्यात

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचे पारपत्र नागपूर पारपत्र विभागाने कह्यात घेतले आहे.