हत्या करण्यासाठी गोवंशीय आणि अन्य जनावरे बाळगल्याप्रकरणी १८ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गुन्हेगार धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यासच गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील धस पिंपळगाव रस्त्यावरील जुना कचरा डेपोजवळ अनधिकृत पशूवधगृहाजवळ ५ गोवंशीय आणि अन्य जनावरे, तसेच त्यांची हत्या करण्यासाठी लागणारे साहित्य जवळ बाळगल्याप्रकरणी धन्यकुमार पटवा यांच्या तक्रारीवरून १८ धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींकडून ७ सत्तुर, ९ सुर्‍या आणि १ कुर्‍हाड अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी मोहम्मद गनी सौदागर, ताहिर बाबुलाल सौदागर, इब्राहीम आरिफ सौदागर, मुनाफ वारीस सौदागर, जमील मकसूद सौदागर, जुल्फेकार सिकंदर सौदागर, फैय्याज गौस कुरेशी, मुद्दिन सत्तार सौदागर, शहबाज कदिर सौदागर, मोहिद्दिन मुस्ताक सौदागर, जैद मुनाफ शेख, गप्फार सत्तार सौदागर, महारुफ मोहम्मद सौदागर, सद्दाम रियाज सौदागर, फैज वहाब सौदागर, नवाज जमील सौदागर, नशीद फकीर सौदागर, रियाज नजीर सौदागर अशी धर्मांधांची नावे आहेत.