अशा राष्ट्रद्रोहींना नेमकी फूस कोणाची आहे, त्याची पाळेमुळेही शोधली पाहिजेत !

सांगली – २०० आणि २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून बनावट नोटांसह ‘कलर प्रिंटर’, ‘एल्.सी.डी. स्क्रीन’, ‘स्कॅनर’ असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. विजय बाळासो कोळी, शरद बापू हेगडे, तेजस सूर्यकांत गोरे (सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. विजय कोळी याच्याकडून दोन सहस्र रुपयांच्या १०, तर हेगडे याच्याकडून २९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती