भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव गोतस्करी टोळीचा म्होरक्या

अशांमुळे भाजपची प्रतिमा समाजात मलीन न झाल्यासच नवल ! यास्तव भाजपने अशांची तात्काळ हाकालपट्टी करणे अपेक्षित !

नागपूर – येथे कत्तलीसाठी जाणार्‍या गोवंशियांची तस्करी करणार्‍या मद्यधुंद १० जणांच्या टोळीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव मनोज पारधी हा या टोळीचा प्रमुख असून त्याचा आणि अरविंद पाठक या दोघांचा या गोतस्करीत हात असल्याचे पुढे येत आहे.

मध्यप्रदेशातील बाकोडा या गावातून १६५ गोवंशियांची तस्करी केली जात होती. गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍यांकडे वाहतूक आणि गुरांचे आरोग्य यांच्याशी संबंधित कागदपत्रेही नव्हती. या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.