सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

पिंपरी (पुणे) शहरामध्ये गत ५ वर्षांत गोहत्येच्या ६४ गुन्ह्यांची नोंद !

पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गेल्या ५ वर्षांमध्ये गायींची चोरी, हत्या आणि गोवंश मांस विक्री या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या संदर्भातील ६४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

नगर येथील पशूवधगृहातून १ सहस्र १०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांना अटक !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही तो धाब्यावर बसवून दिवसरात्र होणार्‍या गोहत्या कधी थांबणार ? कारवाया करूनही या उद्दाम प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व हवे. तरच गोरक्षा शक्य आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

इंदापूर (पुणे) येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षकांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन

इंदापूर येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच मुंबईचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आली आहे.

अमरावती येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका !

इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येत असेल, तर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या गोवंशहत्या बंदी कायद्याच्या कार्यवाहीविषयी प्रश्नचिन्हच उपस्थित होते ! सरकारने कायद्याची कार्यवाही होते का ?, हे पहावे !

९०० किलो गोवंशियांच्‍या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्‍हा नोंद !

पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर दौड तालुक्‍यातील स्‍वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्‍लास्‍टिक ड्रममध्‍ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

अमरावती येथे रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गोमातेचे गोप्रेमी आकाश दाभाडे यांच्याकडून अंतिम संस्कार !

श्री. आकाश दाभाडे हे थडी, जिल्हा अमरावती येथील गोरक्षक आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आहेत. ८ नोव्हेंबर या दिवशी कार्यालयात जात असतांना मार्गात त्यांना गोमाता मृतावस्थेत दिसली.

विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

गोशाळेच्या माध्यमातून २०० गोवंशियांचा सांभाळ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्‍या जाणार्‍या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते.

जळगाव येथे गोरक्षकांनी मृत गायीचे कुत्र्यांपासून रक्षण केले !

शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले.