लांजा – येथील एक हिंदु मालकाने त्याची गाय तालुक्यातील अब्बास नामक धर्मांध दलालाला दीड सहस्र रुपयांना विकली होती. प्रतिदिन दिसणारी गाय न दिसल्याने काही हिंदुत्वनिष्ठ युवकांना शंका आली आणि त्या युवकांनी गायीच्या मालकाला त्याविषयी विचारणा केली असता मालकाने ‘आजच मी गायीला एका दलालाला विकून आलो आहे’, असे सांगितले. (हिंदूंनो, थोड्याशा पैशांसाठी गायीला धर्मांधांना विकून स्वत:चे पाप वाढवू नका ! – संपादक)
ही गोष्ट समजल्यावर हिंदुत्वनिष्ठ युवकांनी त्या मालकाला ‘त्या गायीचे पुढे काय होते ? गोवंश कसा संपत चालला आहे ? आणि त्याला आपणच त्याला कसे कारणीभूत आहोत ?’, याविषयी प्रबोधन केले. घरच्या उर्वरित मंडळींना विश्वासात घेऊन त्यांचेही याविषयी प्रबोधन केले. त्यानंतर हिंदु मालक आणि हिंदुत्वनिष्ठ सगळे मिळून दलालाकडे गेले आणि त्याला त्याचे पैसे परत देऊन गाय परत देण्याची विनंती केली.
दलालाने प्रथम गाय देण्यास नकार दिला; मात्र हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आणि त्यानंतर त्याने घेतलेली गाय मूळ मालकाला परत केली. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे गायीची सुटका झाल्यानंतर गायीच्या घरच्या मंडळींनी हिंदुत्वनिष्ठ तरुणांचे आभार मानले आणि ‘यापुढे अशा तर्हेची गाय विक्री करणार नाही. आम्ही तुमच्या समवेत आहोत’, असे सांगितले.
संपादकीय भूमिकाअसे हिंदुत्वनिष्ठ आता जागोजागी हवेत ! |