पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) येथे दीड सहस्र किलो गोमांस जप्त !

धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन

पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात चालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (वय ३० वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास सवा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून धर्मांधाला शिक्षाही व्हायला हवी !