मुंबईमध्ये उत्साहाच्या भरात अनेकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान !

स्वातंत्र्यकाळात राष्ट्रध्वज पडू नये, यासाठी क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या. स्वातंत्र्योत्तरकाळात राष्ट्रध्वजाचा अवमान होणे, हे नागरिकांमधील देशप्रेम उणावत चालल्याचे द्योतक आहे ! प्रत्येक भारतियाने क्रांतीकारकांसारखी कृतीशील देशभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका !

ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.

पाकिस्तानमध्ये एका विश्‍वविद्यालयातील स्पर्धेमध्ये फडकावण्यात आला भारताचा राष्ट्रीय ध्वज !

या विश्‍वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.

मळगाव (सावंतवाडी) येथे जीर्ण कापडाचे, वेडेवाकडे कापलेले आणि अशोक चक्र मध्यभागी नसलेले राष्ट्रध्वज वितरित !

. . . असे राष्ट्रध्वज पाहिल्यावर ते बनवण्याचा ठेका पाकिस्तानात दिला होता कि काय ? असा प्रश्न पडतो. लोकानी निश्चिती करूनच राष्ट्रध्वज स्वीकारावा आणि सन्मानपूर्वक आपल्या घरी फडकवावा.

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

पोलिसांकडून गुन्हा नोंद
आरोपीचे नाव घोषित करण्यास नकार

कानपूरमध्ये राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटले !

हिंदु संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

(म्हणे) ‘तिरंगा देशाचा ध्वज असतांना तो घरांवर का फडकावावा ?’

ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्‍न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !

राष्ट्रध्वजावर उभे राहून नमाजपठण करणारा अझीझ पोलिसांच्या कह्यात !

येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई येथून आलेल्या महंमद तारिक अझीझ नावाच्या व्यक्तीने भारतीय राष्ट्रध्वज भूमीवर अंथरून त्यावर उभे राहून नमाजपठण केल्याने त्याला कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सावरदरे (पुणे) येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार !

शिक्षकच राष्ट्रध्वजाचा अवमान करत असतील, तर ते विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम कसे रुजवणार ? त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.