केंद्रशासनाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. त्यात कोट्यवधी भारतियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन घर, कार्यालये येथे तिरंगा फडकावला. शासनाकडून ध्वजसंहिता संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतूनही लोक ध्वजसंहितेचा प्रसार करत आहेत. या ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.