मुंबईमध्ये उत्साहाच्या भरात अनेकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान !

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अंतर्गत केंद्रशासनाने नागरिकांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. केंद्रशासनाच्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले होते. यानुसार उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वज लावतांना ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे आढळून आले आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खिडक्यांमध्ये कपडे वाळत घातल्याप्रमाणे चिमटे लावून दोर्‍यांना राष्ट्रध्वज लावले होते. काही ठिकाणी राष्ट्रध्वज आडवा न लावता उभा लावण्यात आला. अनेक दुकानांमध्ये लावलेले राष्ट्रध्वज काठीसह भूमीकडे झुकलेले असल्याचे आढळले. वाहनांवर लावण्यात आलेल्या नायलॉनच्या राष्ट्रध्वजांचे धागे निघाले होते.

संपादकीय भूमिका

  • स्वातंत्र्यकाळात राष्ट्रध्वज पडू नये, यासाठी क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या. स्वातंत्र्योत्तरकाळात राष्ट्रध्वजाचा अवमान होणे, हे नागरिकांमधील देशप्रेम उणावत चालल्याचे द्योतक आहे ! प्रत्येक भारतियाने क्रांतीकारकांसारखी कृतीशील देशभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !