|
मुझफ्फरपूर (बिहार) – येथे औराई गावामध्ये फडकावण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा दाखवण्यात आला. यासह या ध्वजाच्या शेजारी एक हिरव्या रंगाचा ध्वजही फडकावण्यात आला. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तिरंगा ध्वज उतरवून गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव घोषित केलेले नाही, तसेच प्रसारमाध्यमांनाही ‘ते घोषित करू नये’, असे सांगितले. या घटनेमागे माजी सरपंच महंमद इस्रायल असल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रामसूरत राय यांनी केला आहे.
मुजफ्फरपुर में 2 झंडों को लेकर विवाद : लोग बोले- तिरंगे से की गई छेड़छाड़, इसमें अशोक चक्र की जगह चांद और तारा लगे हुए#bihar #flag https://t.co/pqs2XhLNyF
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) August 11, 2022
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचा ध्वज कुणी फडकावला असणार, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत ! |