स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम’ !

सांगली, ८ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई (उजवीकडे)

१. जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

तासगाव येथे कार्यालयीन अधीक्षक वर्षा भानुदास कुंडले (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
 तासगाव येथे पोलीस निरीक्षक संजीव झाडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. पुरण मलमे, श्री. गजानन खेराडकर आणि श्री. सचिन कुलकर्णी

२. तासगाव येथे नगर परिषदेत कार्यालयीन अध्यक्षा वर्षा भानुदास कुंडले यांनी निवेदन स्वीकारले, तर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी संजीव झाडे यांनी निवेदन स्वीकारले. तहसील कार्यालयातही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनाप्रणित ‘शिवसामर्थ्य सेने’चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. पुरण मलमे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सचिन कुलकर्णी, गजानन खेराडकर, राज शिंदे, राजेंद्र माळी उपस्थित होते.

जयसिंगपूर येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
शिरोळ येथील ‘श्री पद्माराजे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज’चे प्राचार्य सी.एस्. पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मंदार पाटुकले, श्री. विनय चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे
शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मंदार पाटुकले, श्री. विनय चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे

३. जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना, तसेच श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सी.एस्. पाटील यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. मंदार पाटुकले आणि श्री. विनय चव्हाण उपस्थित होते.

जत येथे ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’ मधील शिक्षकांना निवेदन देतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीला हत्ती अन् सौ. संगिता पट्टणशेट्टी

४. जत येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेखा पिसाळ यांना, तहसील कार्यालयात तहसीलदार जीवन बनसोडे यांना, तसेच ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’मध्ये निवेदन देण्यात आले.

मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

५. मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे आणि श्री. पराग नाईक, बजरंग दलाचे मिरज तालुका संघटक श्री. आकाश जाधव, युवासेनेचे श्री. अक्षय मिसाळ, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड यांसह अन्य उपस्थित होते.

सांगली येथे भाजपच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने

६. सांगली येथे भाजपच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना निवेदन देण्यात आले.