फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये अभिनेत्री नोरा फतेही यांच्याकडू राष्ट्रध्वजाचा अवमान

अभिनेत्री नोरा फतेही यांच्याकडू राष्ट्रध्वजाचा अवमान

दोहा (कतार) – चित्रपट अभिनेत्री नोरा फतेही यांनी येथे फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या संदर्भात आयोजित ‘फॅन फेस्टिव्हल’मध्ये नृत्य सादर केले. या वेळी त्यांनी हातात घेतलेल्या भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओ यांतून दिसून आले आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

यात नोरा फतेेही यांनी भारताचा राष्ट्रध्वज उलटा धरल्याचे म्हणजे भगव्या रंगाची बाजू खाली आणि हिरव्या रंगाची बाजू वर धरली आहे. या वेळी त्यांनी ‘जय हिंद’च्या घोषणाही दिल्या. तत्पूर्वी कुणीतरी मंचावर राष्ट्रध्वज फेकून नोरा यांना दिला होता. मंचावरून खाली उतरल्यानंतर त्यांनी तो खाली उभ्या असणार्‍या व्यक्तीकडे देऊन टाकला. या घटनेवरून नोरा यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे !