कानपूरमध्ये राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटले !

हिंदु संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे मोहरमच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले. येथे राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटण्यात आले होते, तसेच राष्ट्रध्वजाचा आकारही पालटण्यात आला होता. या मिरवणुकीचा एक व्हिडिओ ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केला होता. त्यावरून आता या घटनेला विरोध केला जात आहे.

याविरोधात बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी कानपूर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. यावर आयुक्तांनी ‘याची चौकशी करून गुन्हा नोंदवण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक