सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीची ख्रिस्ती संस्थाचालकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार !

चर्च आणि त्यांच्या वतीने चालवणार्‍या संस्था यांचे आर्थिक स्रोत बंद केल्याविना त्यांच्याकडून होणारे छुपे धर्मांतर थांबणार नाही !

डहाणू येथे हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पडला !

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराचा डाव हाणून पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठ महिला आणि गावकरी यांचे अभिनंदन !

पोप फ्रान्सिस यांनी केवळ कॅनडामध्ये न जाता भारतातही येऊन क्षमा मागावी !

ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस ५ दिवसांच्या ‘प्रायश्चित्त तीर्थयात्रे’साठी कॅनडामध्ये पोचले आहेत. ‘कॅनडातील निवासी शाळांतून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी बालकांशी केलेल्या दुर्व्यवहारासाठी पोप फ्रान्सिस मूलनिवासी समुदायाची क्षमा मागू शकतात’, असे म्हटले जात आहे.

कॅनडातील कॅथॉलिक चर्चच्या शाळांमधील मुलांवर झालेल्या अत्याचारांविषयी पोप फ्रान्सिस क्षमा मागणार !

पोप फ्रान्सिस किती आणि कुठे कुठे जाऊन क्षमा मागून पाद्री आणि चर्च यांच्या कुकृत्यांना पाठीशी घालणार आहेत ? ज्यांच्याकडून अत्याचार केले जातात, त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची व्यवस्था चर्चकडून का केली जात नाही ?

कॅथॉलिक चर्चमध्ये लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पाद्य्रांना ब्रह्मचारी रहाण्याचा नियम पालटण्याची सिद्धता !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक चर्चच्या पाद्य्रांसाठी असलेली ‘प्रिस्टली सेलिबेसी’ ही प्रथा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदु धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणात कलंकित केले जात नाही ! – मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत

हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

‘नन’वर बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला ‘पाद्री’ म्हणून पुन्हा काम करण्यास पोप यांची अनुमती

केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती

वाहनकर वसुलीसाठी पास्टर (पाद्री) डॉम्निक याला नोटीस

धर्मांतर करून पैसे कमावणारा पाद्री डॉम्निक याला सरकारने कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! त्याने आतापर्यंत जमवलेल्या संपत्तीचीही कसून चौकशी झाली पाहिजे !

हिंदुहितैषी निर्णय स्वागतार्ह !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !

पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत !