|
ठाणे, १२ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने मागील आठवड्यात नवी मुंबई येथील ‘सी वूड’ परिसरातील एका संस्थेच्या विरोधात चर्चमध्ये अवैध आश्रमशाळा चालवल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईच्या वेळी सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांची मागील ८ दिवसांपासून ‘बाल कल्याण समिती’च्या वतीने चौकशी चालू होती. या चौकशीच्या वेळी १४ वर्षीय मुलीने संस्थाचालक मागील काही मासांपासून तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार अधिकार्यांजवळ केली. (हे आहे ख्रिस्ती संस्थांच्या बालकल्याणाचे खरे स्वरूप ! अशांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक) या तक्रारीच्या आधारे ‘जिल्हा महिला बाल विकास’ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संबंधित संस्थाचालकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. येथे अन्यही अपप्रकार बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चच्या वैधतेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
संबंधित चर्चच्या वतीने बेघर, वयोवृद्ध, मतिमंद नागरिक यांसमवेतच अल्पवयीन मुलांचा मागील काही वर्षांपासून सांभाळ केला जात आहे; परंतु मागील काही दिवसांत या ठिकाणी लहान मुलांची संख्या वाढत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार अधिकार्यांनी ५ ऑगस्ट या दिवशी चर्चला अचानक भेट दिली. त्या वेळी केवळ ३ लहान खोल्यांमध्ये ४५ अल्पवयीन मुले, तसेच इतर बेघर आणि मतिमंद अन् वयोवृद्ध नागरिक अत्यंत अस्वच्छ स्थितीत रहात असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आले.
संबंधित चर्च चालवणार्या व्यक्तीची चौकशी केली असता ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे २००६ या वर्षी संस्था नोंदणीकृत केली असल्याचे त्याने सांगितले; मात्र त्याविषयीची कोणतीही कागदपत्रे त्याला सादर करता आली नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकार्यांनी सर्व मुलांची रवानगी उल्हासनगर आणि नेरूळ येथील शासकीय बालगृहात केली होती.
संपादकीय भूमिका
|