ख्रिस्ती पाद्रींच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना शिक्षा होण्यासाठी भारतीय कायदा सक्षम होणे आवश्यक !
१. जगाला दया, क्षमा आणि शांती यांचे उपदेश देणार्या ख्रिस्ती पाद्र्यांनी अनैतिक कृत्ये करणे
‘जगभरात दया, क्षमा आणि शांती यांचे ठेकेदार बनलेले ख्रिस्ती, प्रभु येशूच्या नावावर किती पापकर्म करतात, याची कोणतीही सीमा नाही. तसे ख्रिस्तीयतचे म्हणणे आहे की, ‘तुम्ही कितीही सत्कर्म करा, जनहिताचे कार्य करा… परंतु तुम्ही प्रभु येशूला शरण आला नाहीत, तर पापीच रहाल आणि तुम्हाला नरकाच्या अग्नीमध्ये जळावेच लागेल. तुम्ही ज्या क्षणी ख्रिस्ती झाला आणि येशूला तुमचा उद्धारक समजले, तर तुमची सर्व पापकर्मे एका क्षणात माफ होतील. प्रभु तुमच्या पापांची शिक्षा भोगेल.’ म्हणूनच चर्च आणि चर्चसंचालित शाळा, केंद्र, निवासस्थान या ठिकाणी पाद्री कोणतीही भीती अन् नीतीमत्ता न बाळगता लैंगिक शोषणासारखे दुष्कृत्य करतात का ?
२. ख्रिस्त्यांनी लैंगिक शोषण करणार्या बिशपचे उदात्तीकरण करणे
खरेच क्षमा मागितल्याने पापकर्म आणि पीडित बालकांची वेदना अन् दु:ख समाप्त होते ? याचे केरळमध्ये बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांचे प्रकरण सर्वांत मोठे उदाहरण आहे. लैंगिक शोषण करणार्या बिशपला जामीन मिळाल्यानंतर त्याचे फुले उधळून जंगी स्वागत करण्यात आले आणि तसेच ज्या ननवर बलात्कार करण्यात आला होता, तसेच जिचे शोषण झाले होते, तिला चर्चमधून त्वरित बाहेर काढण्यात आले. यालाच न्याय म्हणतात का ?
३. कथित प्रकरणी हिंदु साधू संतांवर गरळओक करणार्या माध्यमांनी ख्रिस्ती संस्थांमधील लैंगिक शोषणावर गप्प बसणे
याच केरळमध्ये सिस्टर जेसमी हिने ‘आमेन-एक नन आत्मकथन’ नावाचे पुस्तक लिहून चर्च आणि पाद्री यांची दुष्कृत्ये उघड केली आहेत. तरीही ना चर्च कारवाई करत आहेत, ना सरकार ! बस केवळ पोप ठिकठिकाणी जाऊन क्षमायाचना करत आहेत. अशाच प्रकारे समर्थन मिळाल्याने नवी मुंबईमध्ये चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळा आणि अनाथालये यांमध्ये दुष्कृत्यांची प्रकरणे समोर येत आहेत. पोलीसही मुळापर्यंत जाऊन अन्वेषण करत नाहीत. पाद्र्याला अटक केल्यानंतर चर्चच्या कोणत्याही विश्वस्ताला साधी चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले नाही. ‘सेक्युलर’ (निधर्मी) माध्यमेही गप्प बसली आहेत. अशीच घटना एखाद्या हिंदु न्यासामध्ये घडली असती तर …!
४. चर्चच्या इतिहासाची कलंकित काही उदाहरणे !
अ. शतकांपूर्वी झालेल्या धार्मिक क्रूसेडपासून स्पेन, पोर्तुगाल, मेक्सिको आणि पेरू येथील ‘इन्क्विझिशन (धर्मच्छळ)’, महिलांना ‘विच’ (witch चेटकीण) म्हणत जिवंत जाळणे, तसेच यहुदी इत्यादी पंथियांच्या हत्या करणे आदी गुन्ह्यांसाठी चर्च गुन्हेगार आहे. एका अनुमानित आकडेवारीनुसार वर्ष १४५० ते १७५० या कालखंडात १ लाखाहून अधिक महिलांना चेटकीण घोषित करून ठार मारण्यात आले होते. यात ख्रिस्ती विरांगना ‘जोन ऑफ आर्क’चाही सहभाग आहे, जिचा पराक्रम पसंत न पडल्याने तिलाही गुन्हेगार घोषित करून ठार मारण्यात आले.
आ. २५ डिसेंबर १८८१ या दिवशी पोलंडच्या वारसॉमध्ये धर्मांध ख्रिस्त्यांनी १२ यहुदींना निर्घृणपणे ठार केले, तर अनेक महिलांवर बलात्कार केले.
इ. मार्च २००० मध्ये तत्कालीन दिवंगत पोप जॉन पॉल-२ यांनी कोणतेही संदर्भ किंवा वैयक्तिक गुन्हेगाराचे नाव न घेता चर्चकडून झालेल्या पापांसाठी क्षमायाचना केली होती.
ई. काही मासांपूर्वी कॅनडामध्ये चर्चने स्थापना केलेल्या २ निवासी शाळांमध्ये १ सहस्र मुलांची थडगी मिळाली. अशा अनेक शाळांच्या (वर्ष १८७६-१९९६) माध्यमातून कॅनडातील लक्षावधी मूळ निवासी आदिवासींना ख्रिस्ती करण्यात आले होते.
५. लैंगिक शोषण करणार्या पाद्र्यांना योग्य शिक्षा मिळण्यासाठी भारतीय कायदे सक्षम करणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी ‘फ्रान्सच्या अनेक चर्चमध्ये पाद्र्यांकडून ७० वर्षांत ३ लाख ३० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केले’, असे उघड केले होते. या बीभत्स स्पष्टीकरणांना पोप यांनी लज्जास्पद म्हटले होते. ऐतिहासिक चुका किंवा गुन्हे यांच्याविषयी रोमन कॅथॉलिक चर्चकडून पश्चात्ताप किंवा क्षमायाचना करणे, ही नवीन गोष्ट नाही. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन पोप बेनेडिक्ट-१६ यांनी, तर सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१८ मध्ये सार्वजनिक क्षमायाचना केली. आता केवळ क्षमायाचना केल्याने भागणार नाही. ‘कन्फेशन’च्या (पापाची स्वीकृती देण्याच्या) आधारावर लैंगिक शोषण करणार्या पाद्रींना त्यांचा प्रभु कधी शिक्षा करील माहिती नाही; पण भारताची राज्यघटना आणि कायदा त्यांच्या दुष्कृत्यांसाठी गंभीर शिक्षा देण्यासाठी सक्षम झाला पाहिजे.’