पुणे येथील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रावर गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या हस्तक्षेपानंतर कारवाई

हडपसर (जिल्हा पुणे) – येथील १३ वर्षीय शालेय मुलावर पाद्री (ख्रिस्ती धर्मगुरु) विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. याआधीही या पाद्य्रावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेले आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईवडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र तेथेही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो आणि मारुति भापकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण पुन्हा हडपसर पोलिसांकडे नेले. तेथे न्याय मिळत नाही म्हणून ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही भेटले. तरीही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. शेवटी या सामाजिक कार्यकर्त्यांनी देहली येथील ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगा’कडे (‘एन्.एच्.आर्.सी.’कडे ) तक्रार केली. त्यानंतर जवळ जवळ १० मासांनंतर आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली आणि त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि तेथून पुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पीडित मुलाच्या आईवडिलांनी सांगितले की, हडपसर पोलिसांच्या टोलवाटोलवी नंतर त्यांनी ४ पोलीस ठाणी आणि १ पोलीस चौकी येथे तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विन्सेंट परेरा यांना बोलावून घेतले आणि तोंडी क्षमा मागायला लावली आणि प्रकरण मिटल्याचे सांगितले. (लैंगिक शोषण करणार्‍या गुन्हेगार पाद्य्राला बोलावून केवळ क्षमा मागून प्रकरण मिटवणारे पोलीस समाजद्रोहीच आहेत. स्वतःच्या मुुलासमवेत असे झाले असते, तर पोलिसांनी असेच केले असते का ? – संपादक) त्यानंतर आरोपी विन्सेंट परेरा यांनी पीडित मुलाच्या आईवडिलांनाच धमकावल्याचे समोर आले आहे.

‘पोक्सो’चे कठोर कलम न लावणार्‍या पोलिसांची भूमिका संशयास्पद

पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यातील १६ आणि २१ हे कठोर कलम जाणीवपूर्वक लावलेले नाही. या कायद्यातील केवळ कलम ८ च लावले. याच त्रुटीचा लाभ मिळून विकृत आरोपी परेरा यांना पुणे सत्र न्यायालयातून जामीन मिळाला; मात्र लोबो आणि भापकर हे या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. (हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी अशा पाद्य्रांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! अशा पोलिसांमुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे !
  • पीडित मुलाच्या पालकांना ५ पोलीस ठाण्यांत जाऊनही न्याय मिळत नसेल, तर पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती हवा कशाला ? अशा पोलिसांना संकटकाळी हिंदूंनी तरी साहाय्य का करावे ?
  • हिंदूंनो, मुलांना ख्रिस्त्यांच्या शाळेत प्रवेश घ्यायचा का ? ते ठरवा !