नन आणि पाद्री इंटरनेटवर अश्‍लील (पॉर्न) व्हिडिओ पहातात !

पोप फ्रान्सिस यांची जाहीर स्वीकृती !

व्हॅटिकन सिटी – सर्वसामान्यांप्रमाणे नन आणि प्रिस्ट (पाद्री) हेही ‘ऑनलाईन’ अश्‍लील (पॉर्न) व्हिडीओ पहातात. ही एक वाईट सवय असून ती अनेकांमध्ये आहे. महिला आणि पुरुष यांच्यामध्ये ती आहेच, तसेच पाद्री आणि नन यांच्यातही ती आहे, अशी जाहीर स्वीकृती ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी दिली. रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये भविष्यातील पाद्य्रांसाठी आयोजित एका सभेत ते बोलत होते. ‘सर्वसामान्य माणूस अशाच पद्धतीने सैतान बनत आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

जो प्रतिदिन प्रभु येशूला शुद्ध हृदयाने पूजतो, तो अश्‍लीलतेच्या आहारी जाऊ शकत नाही !

चर्चमधील एका विद्यार्थ्याने पोप फ्रान्सिस यांना प्रश्‍न विचारला होता, ‘भक्तांनी भ्रमणभाष संचासारख्या सुविधांचा वापर केला पाहिजे कि नाही ?’ यावर पोप फ्रान्सिस यांनी उत्तर देतांना म्हटले, ‘भ्रमणभाष संचाचा वापर हा संवादासाठी करणे उचित आहे; मात्र दृकश्राव्य अश्‍लीलता काय आहे ? ते तुम्हाला ठाऊक आहे. जो प्रतिदिन प्रभु येशूला शुद्ध हृदयाने पूजतो, तो अशा प्रकारच्या अश्‍लील सामुग्रीच्या आहारी जाऊ शकत नाही. जर तुम्ही या अश्‍लील गोष्टी तुमच्या भ्रमणभाष संचामधून पुसू शकत असाल, तर ते पुसून टाका.

संपादकीय भूमिका

हे आहे ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! यावर भारतातील प्रसारमाध्यमे, कथित निधर्मीवादी आणि ‘ख्रिस्त्यांना शांतीप्रेमी म्हणवणारे’ पुरो(अधो)गामीवाले काही बोलतील का ?