पुणे रेल्वे स्थानकासमोर एका शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या पाद्य्राला अटक !

पुणे – गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला पुणे रेल्वे स्थानकासमोर १५ वर्षांच्या एका शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ५५ वर्षीय ख्रिस्ती पाद्य्राला २५ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. या अत्याचाराची माहिती लपवल्याप्रकरणी चर्च आणि कॅथलिक संस्थांच्या प्रशासकीय मंडळाच्या अधिकार्‍यांसह इतर ५ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (लैंगिक शोषण करणार्‍या धर्मगुरूंची पाठराखण करणार्‍या ख्रिस्ती संस्थांचे अधिकारी समाजद्रोहीच आहेत. त्यांच्यावर केवळ गुन्हा नोंद न करता त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक) या प्रकरणी एका ख्रिस्ती मानवाधिकार कार्यकर्त्याने तक्रार प्रविष्ट केली आहे. पाद्य्राला विशेष न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

साहाय्यक निरीक्षक शिल्पा लांबे यांनी सांगितले की, या पाद्रयावर वर्ष २०१८ मधे वानवडी पोलीस ठाण्यात, तसेच वर्ष २०२२ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराशी संबंधित २ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. (पाद्य्रांकडून गेली अनेक दशके बालकांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे आरोप होत असूनही या घटना अद्याप न थांबण्यामागे ‘पाद्य्रांवर कठोर कारवाई केली न जाणे’, हेच मुख्य कारण आहे, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक) पीडित मुलाच्या पालकांनी याविषयी ख्रिस्ती संस्थांच्या प्रशासकीय मंडळाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती; परंतु त्यांनी आरोपीवर काहीही कारवाई केलेली नव्हती. यावर धर्मगुरूंना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे आरोपींचे अधिवक्ता मिलिंद पवार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी वासनांध पाद्रयांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी कृत्ये करणार्‍यांना त्यांच्या पदावर रहाण्याचा तरी अधिकार आहे का ?