ख्रिस्ती धर्मगुरूंनी अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नयेत ! – गोव्याचे आर्चबिशप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिल्यानंतर २४ घंट्यांच्या आत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून अशा घटनांविषयी चर्चची भूमिका स्पष्ट केली आहे.

यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ख्रिस्त्यांचे देव सत्य आहेत आणि हिंदूंचे देव खोटे अन् आंधळे आहेत, असेच या पाद्रयांकडून इतरांना सांगितले जाते. असा उद्देश असलेल्या आंतरधर्मीय चर्चा घेणे म्हणजे धर्मांधताच होय !

गोव्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या चर्चने गोमंतकियांची क्षमा मागावी !

सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्‍या खांद्याला खांदा लावून गोव्‍यातील धर्मांतरित नवख्रिस्‍ती आणि हिंदूंना ‘इन्‍क्‍विझिशन’द्वारे (धर्माच्‍छळाद्वारे) जिवंत जाळण्‍यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्‍याच्‍या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

(म्हणे) ‘गोव्यात ‘मणीपूर’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते !’ – ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत लेख

चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्‍या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !

 महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

एरव्ही हिंदूंच्या साधू-संतांवर केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांवरून आकाशपाताळ एक करून हिंदु धर्मावरच चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !

‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा !- अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्‍ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्‍ती मिशनरी, साम्‍यवादी, प्रसारमाध्‍यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्‍यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्‍यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्‍ये योगी आदित्‍यनाथ देशविरोधी शक्‍तींच्‍या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत.

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्ता (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते.