समलिंगी विवाह करणार्‍यांना आशीर्वाद देण्यास पोप यांनी दिली मान्यता

समलिंगी विवाह यांना ‘सामान्य विवाह’ म्हणून मान्यता नाही

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी विवाह करणार्‍या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाद्य्रांना अनुमती दिली आहे. त्याचा उद्देश चर्च अधिक सर्वसमावेशक बनवणे हा आहे. पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे की, विवाह म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील आजीवन मिलन आहे. समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्याचा संबंध कॅथॉलिक उत्सवाशी किंवा धार्मिक आधाराशी जोडणे चुकीचे ठरेल. पोप म्हणाले की, समलिंगी जोडप्यांनी जर आशीर्वाद देण्याची विनंती केली, तर ती नाकारली जाऊ शकत नाही. असे असले, तर असे विवाह वैध ठरवण्याचा कोणताही हेतू नाही. आशीर्वाद देणे म्हणजे एखाद्याचे जीवन देवासाठी खुले करणे, त्याला किंवा तिला चांगले जीवन जगण्यास साहाय्य करण्याचे आवाहन करणे होय.

सौजन्य 5 न्यूज 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅटिकन सिटीने केलेल्या घोषणेनंतर लोक दोन गटांत विभागले गेले आहेत. काही लोकांनी कॅथॉलिक चर्चमधील भेदभाव संपवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. त्याच वेळी, समलिंगी तज्ञांचे असे मत आहे की, चर्च समलिंगी विवाहांना सामान्य विवाहांपेक्षा कनिष्ठ मानत आहे.