आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान !

जुन्नर – पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवनेरीहून रायगडाच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पादुकांवर पवमान अभिषेक आणि रुद्राभिषेक झाला. त्यानंतरच श्री शिवाईदेवीची महापूजा बांधून आणि महाद्वार पूजन करून हा पालखी सोहळा रायगडाकडे मार्गस्थ झाला. शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे ८ वे वर्ष आहे.