सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा  !

सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतांना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर

सोलापूर, ६ जून (वार्ता.) – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, तसेच कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी झोन अधिकारी तपन डंके, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.